निर्गुडा नदीचे पाणी पुलावरून वाहात असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात एक 60 वर्षीय इसम पुराच्या प्रवाहासोबत वाहून गेला. पण नशिब बलवत्तर म्हणून एक झाड हाताला लागले आणि तेच त्याच्यासाठी जीवनदाता ठरले. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी सकाळी रेक्यु करुन त्याला पुरातून बाहेर काढण्यात नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले.