भंडारा शहरातील साई प्लाझा राजस्थानी भवनासमोर भंडारा जिल्ह्यात लघु उद्योग भारती संघटनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान करण्यात आले होते. लघु उद्योग भारती ही देशभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची (MSME) एकमेव अखिल भारतीय संघटना आहे. भंडारा जिल्ह्यात आज नव्या जोमाने या संघटनेची पुनःश्च सुरुवात झाली आहे. ही बाब स्थानिक उद्योजक व उद्योगविश्वासाठी नक्कीच आशेची आणि प्रेरणेची आहे.