संपूर्ण देशासह राज्यात गणेश चतुर्थी मोठा उत्साहात साजरी होत असताना आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी साडे चार वाजता अमरावती शहरातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मूर्ती स्थापनाच्या कार्यक्रमामध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थिती दर्शवून भाविक भक्तांसोबत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी प्रामुख्याने - टाळ मृदुंगाच्या तालावर अमरावती लोकसभेचे विद्यमान खासदार बळवंतभाऊ वानखडे व माजी खासदार अनंतरावजी गुढे यांनी ठेका धरला....