सावंतवाडी येथील मोती तलावात असलेल्या मगरीला पिंजऱ्यामध्ये पकडण्यात अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे. सुमारे पाच फूट लांबीची ही मगर आज बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जलद कृती दलाच्या सापळ्यात अडकली. त्यामुळे सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.