मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभुल करणे थांबवावे, शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मराठा समाजाला काहीच मिळालं नाही, त्यांनी आधी त्याचा अभ्यास करावा, कायदा समजून घ्यावा असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना दिला असून गुलाल उधळल्याने सत्य लपत नाही, असा टोलाही लाखे पाटील यांनी लगावलाय. सोमवार दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता जालना येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनोज जरांगे यांना जीआर वरून धारेवर धरले जात आहे.