बीड शहरातील सौभाग्य लॉन्स येथे बंजारा समाजाच्या वतीने भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित राहिले होते. आपले हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी झालेल्या या सभेत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या वेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात मोडतो.