१८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेदरम्यान रोहणा येथे उघडकीस आली आहे. रोहणा येथील कु कांचन विनोद सावंग वय १८ वर्ष ही तरुणी काँप्युटर क्लासेसमध्ये जाते व तेथुन खामगाव येथे कॉलेजमध्ये सर्टिफिकेट आणण्यासाठी जाते असे सांगुन घरून निघुन गेली. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत विनोद सावंग यांनी तक्रार दिली.