राधानगरी तालुक्यातील तळेवाडी येथील श्री संयुक्त भूतोबा कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यंदा आपला सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करत आहे.या औचित्याने मंडळातर्फे पारंपरिक ढोल-ताशा,टाळ-मृदंग आणि लेझीमच्या गजरात गणरायाचे आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य स्वागत करण्यात आले.‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमांतर्गत संपूर्ण गावकऱ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला.या स्वागत सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला.