महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दि.२२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता बैल पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.पोळा सणानिमित्त मानाच्या बैलांना सजवून वाजत गाजत मंदिरात मंदिरात आणून पूजा करण्यात आली. यावेळी वर्षभर शेतात राब राबून कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.