कोपरगात शहरात आज ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वा. गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मंडळांनी आपापल्या गणेशमूर्तींना निरोप देण्यासाठी मिरवणुकीस सुरुवात केली. गोदावरी नदीपात्रा नजीक विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नदीकाठावर सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी, तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.