महागाव तालुक्यातील काळी दौ सह परीसरात आज गुरुवारी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आला या पावसामुळे शेतातील कापूस, तूर, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काळी दौ सह परीसरात आज गुरुवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला, आभाळ दाटून आले, विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य पावसाला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील कापूस तुर सोयाबीन ज्वारी पिके वादळी वाऱ्यामुळे तसेच पावसामुळे आडवी झाली.