नांदेड जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आणेराव यांनी आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाच्या दिवशीच टांझानिया देशातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे तिरंगा झेंडा फडकावला. नांदेड येथून निघालेल्या लोपामुद्रा यांनी दि ११ ऑगस्ट रोजी किली मांजरो या ५ हजार ८९५ मिटर उंच शिखरावर जाण्याची सुरवात केली. दिवसभर चालणे, रात्री मुक्काम करणे, पुन्हा दिवसभर चालणे अशा पद्धतीने त्या भागातील पर्यावरणाची सवय करून घेतली आणि समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फुट उंच