केज येथील तहसील समोर आवादा कंपनीच्या विरोधात न्यायासाठी उपोषण करणाऱ्या एका शेतकरी महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आवादा कंपनीचे अधिकारी हे पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार वीजेचे खांब शेतात बसवीत नसून त्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना दमदाटी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या मागाण्यासाठी केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी आणि महिला आमरण उपोषणाला बसल्या होत्या.केज शिवारातील सर्वे नंबर ७६ मध्ये त्यांच्या शेत जमिनी आहेत.