मोहोळ तालुक्यातील पेणुर गावात गाडीच्या पैशावरून उद्भवलेल्या वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता विलास चव्हाण (वय ३५, रा. पेणुर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या दिर दुर्गाप्पा चव्हाण आणि त्याची पत्नी उज्वला यांच्यात गाडीच्या पैशावरून वाद झाला.