24 ऑगस्टला बिरेन्द्र यादव राहणार झारखंड हे ट्रक घेऊन पश्चिम बंगाल येथे जात असताना ते बाथरूम करण्यासाठी नागपूर जबलपूर हायवे रोडच्या कडेला ट्रक थांबवून उतरले असता अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार पारडी पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची पोलिसांनी त्वरित दखल घेत आरोपी शकील खान हसन खान, आसिफ अली युसुफ अली, आशिक हुसेन निसार अली, गुलाम परवेज अली यांना अटक केली.