धुळे शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या रेल्वे स्टेशन रोडची एका भागात अत्यंत दुरवस्था झाली आहे. फाशी पूल ते स्टेशन चौकादरम्यान वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने रस्त्यावर खड्ड्यांची मालिकाच तयार झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे दररोज किरकोळ अपघात घडत असून, अनेक महिला व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत.