जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेच्या शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. आज दि ३० ऑगस्ट ला १ वाजता रेल्वे स्थानक बल्लारपूर येथे घटना उघडकीस आली. मुंबईहून येणारी नंदीग्राम एक्स्प्रेस क्रं ११००१ ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहचली होती. त्यात शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आला.