बाजारगाव येथे सोलार कंपनीत झालेल्या भयानक स्फोटामध्ये पारडसिंगा येथील रहिवासी मनोज देवघरे हे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. दरम्यान आमदार ठाकुर यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. या प्रसंगी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सहाय्य वेळेवर उपलब्ध करून देण्याची खात्री दिली.