अमळनेर शहरात धार्मिक मिरवणूक मध्ये काल काही किरकोळ वाद अफवांमुळे निर्माण झाला होता .या प्रकरणी आम्ही अमळनेर पोलिसात संशयीता विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच ते दहा संशयतांना ताब्यात घेतले आहे .याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. यात काही नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत आम्ही माहिती घेत असून .मी जनतेस आवाहन करते की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता केले आहे