जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा मोठा र्हास होत आहे. पर्यावरणीय बदलाची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना असतांनाही त्यांनी अशा वृक्षतोडीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे म्हणजे भ्रष्टाचाराला वाव देण्यासारखे आहे. अनेकांनी वृक्षतोडीची माहिती वनपालाच्या लक्षात आणून दिली, तरी देखील वनपालांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करुन बडतर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांनी शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी दु. 4 वा. केली.