आज गुरुवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जवाहर नगर परिसरात मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेऊन मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा केली आहे, मराठ्यांचा हा ऐतिहासिक विजय झाल्याच्या भावना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे व्यक्त केले आहे, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची तब्येतीची सुद्धा विचारपूस अंबादास दानवे यांनी केली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.