तुमसर तालुक्यातील धनेगाव येथे दि. 21 ऑगस्ट रोज गुरुवारला सायं.6 वाजता दरम्यान सिहोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या आरोपी महिला सुनंदा बालकदास उईके या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक बॉटलमध्ये ठेवलेली 4 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.