कळंबा खुर्द परिसरात वाघाचे थरारक दर्शन अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कळंबा खुर्द येथे वाघाच्या दर्शनाने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री डॉ. सुभाष शिरसाट यांना त्यांच्या गाडीजवळ दोन बिबटे दिसले. यापूर्वी सकाळी लक्ष्मण वाघमारे यांना बसस्टँडजवळील शेतशिवारात बिबट्या आढळला होता. गावकऱ्यांनी पोलिस पाटील आणि वन विभागाला माहिती दिली असून, कळंबी महागाव आणि कळंबा खुर्द परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.