संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दि. 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तुमसर तालुक्यात या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये लक्ष्मी मुक्ती योजना राबविणार असून या योजनेत लागणारे आवश्यक कागदपत्र गोळा करून या अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आज दि. 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 2 वा. तुमसर चे तहसीलदार गणेश दिघे यांनी केले आहे.