म्हसळा तालुक्यातील पाष्टी येथील दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी जीवन गोविंद लाड यांच्या ५ गाई आणि २ बैल जंगलात चरण्यासाठी गेली असता सायंकाळी घराकडे परतत असताना केळीची गोठण येथे विज वाहक तार तुटून पडल्याने गुरांना विजेचा शॉक लागून ७ गाय जनावरे जागीच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सदरची घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली असल्याचे सांगण्यात आले.दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी गाई व बैल गोठ्यात आली नाहीत म्हणुन शेतकरी जीवन लाड शोध घेत असताना त्यांना ती मृतावस्थेत आढळली.