सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात मॅकग्रा हिल या अमेरिकेतील विख्यात वैद्यकीय पाठ्यपुस्तक प्रकाशन संस्थेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यान्वित करण्यात आले. या मॅकग्रा हिल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खाणकाम राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.