तुमसर तालुक्यातील मांगली येथे एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 9 सप्टेंबर रोज मंगळवारला पहाटे 4 वाजता च्या सुमारास उघडकीस आली.आकाश शंकर नेवारे असे मृतक युवकाचे नाव असून तो आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. यावेळी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग तुमसर पोलीसात दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहेत.