धुळे कापडणे गावात डॉल्बी सिस्टीम लेझर लाईट प्रतिबंधाचे आदेश जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांनी लागु केले.त्या नियमांचे उल्लंघन केले गेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी एक डि जे वाहन सोनगीर पोलीसांनी जप्त केले आहे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती 8 सप्टेंबर सोमवारी सोनगीर पोलीसांनी दिली आहे. कापडणे गावात 7 सप्टेंबर सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांनी लागु केलेल्या डॉल्बी सिस्टीम लेझर लाईट प्रतिबंधाचे आदेशाचे उल्लंघन केल्याने सोनगीर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे.