औसा -औसा शहर, परिसर व तालुक्यात नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू केल्याने सर्वसामान्यांचा तीव्र आक्रोश उसळला आहे. वाढलेली विजबिले, अन्यायकारक वसुली आणि जाचक अटींमुळे जनतेचा विश्वास ढासळत चालला असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.शासन व महावितरणने नागरिकांशी संवाद साधल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे, अशी ठाम मागणी आज सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.