पातूर तालुक्यातील आलेगाव येथे काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने आठवडी बाजार जलमय झाला. वादळवार्यामुळे कापड, मसाले, मिसळ व भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. बाजारात आलेल्या शंभराहून अधिक नागरिकांना निर्गुणा नदीला पूर आल्याने काही काळ अडकून पडावे लागले. काहींना जीव वाचवण्यासाठी सामान सोडून द्यावे लागले. सुदैवाने जीवितहानी टळली. नागरिकांना मोठा फेरीमार्ग करून गावात परतावे लागले. या नदीवर अद्याप पूल नसल्यामुळे दरवर्षी अशीच समस्या उद्भवते.