जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते राजुर रस्त्यावर शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे अंदाजे 6 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार रस्त्याच्या कडेला असणार्या विहिरीत जावून पडली होती. या अपघाताची माहिती समजताच या घटनेचे गांभिर्य ओळखून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या मदतीला धावल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने मदतकार्य पोहचविले. असल्याची माहिती शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता दिली.