धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोन या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी आज धुळे शहराचे भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल हे आले असता यावेळी नागरिकांनी अनेक समस्या या आमदार अनुप अग्रवाल यांच्यासमोर मांडल्या. मात्र याच परिसरातील विघ्नहर्ता कॉलनी येथील नागरिकांनी प्रत्येक पावसाळ्यात आमच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे घरातलं बाहेर पडणं देखील आम्हाला मुश्किल होतं असल्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.