स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराला कार्यक्षेत्रातील महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी महिलांचे आरोग्य तपासणी व उपचार ,तसेच रक्त तपासणी देखील करण्यात आल्या.