पाचोरा - स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत पाचोरा शहरात आज विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंना विरोध व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन अभियान राबविण्यात आले. यावेळी स्वदेशी जागरण मंचचे जळगाव जिल्हा सह संयोजक गिरीश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा प्रांताधिकारी यांना आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता निवेदन देण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.