हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणाचे चार दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येलदरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पूर्णा नदीपत्रात पाण्याचा विसर्ग 4 दरवाजा मधून करण्यात येत असून त्यामुळे पूर्णा नदी काठावरील सेनगांव तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता प्राप्त झाली आहे.