शिरपूर शहरातील करवंद नाका येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दाम्पत्याला चार अज्ञात संशयीतांनी चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी देत २० हजार रुपये व एटीएम कार्ड हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करीत आहे.