तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार बोगस मतदारा नोंदणीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आलं.बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न करणारे लोक हे भाजप आ.राणा पाटील यांच्या तेरणा कॉलेजशी संबंधित असल्याचा आरोप खा.ओमराजे यांनी केला होता.ओमराजे यांच्या आरोपावर त्यांना आरोपाशिवाय दुसरं का येतं असं म्हणत राणा पाटलांनी प्रतिप्रश्न केला.तसेच तुळजापूर प्रकरणांमध्ये आरोप आहेत त्याची चौकशी व्हायला हवी असेही मत त्यांनी यावेळी मांडले.जिल्हाधिकारी कार्यालयात ते दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 माध्यमांशी बोलत होते.