इचलकरंजी शहरात आज सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून काढल्या जात आहेत.मात्र,या धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवरही आगामी महापालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांचा राजकीय प्रभाव ठळकपणे जाणवला.शहरातील प्रमुख मार्गांवर गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.