तालुक्यातील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पणज सह तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालय विविध ठिकाणी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी 5 सप्टेंबर शिक्षक दिन निमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात येऊन सर्वत्र उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेत त्यांच्या गुरु कृपेबाबत प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या