दिग्रस शहरात होणाऱ्या बैलपोळा, भवानी यात्रा व श्री गणेश उत्सव या पारंपरिक सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दि.२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी महत्त्वाची पाहणी केली. या पाहणीत दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, दिग्रस पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, नगरपरिषद मुख्याधिकारी अतुल पंत आणि महावितरण शाखा दिग्रसचे विद्युत अभियंता बालपांडे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी पोळा मैदान, होलटेकपुरा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शंकर टॉकीजची पाहणी केली.