स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जावली तालुक्यातील सरताळे येथील राज इंडियन लॉजवर छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये वेश्यागमनासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका पोलिसांनी केली असून त्यामध्ये कामगार सचिन तुकारा भिसे, सुरज नंदकुमार भिसे दोघे रा. सरताळे यांना ताब्यात घेतले असून रावेश शेट्टी रा. उडपी हा फरार झाला असून तिघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.