सणसूद आणि गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव उपविभागात ६७३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी ही कारवाई केली आहे. कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून बुधवारी दुपारी चार वाजता याबाबतची माहिती देण्यात आली. गणेशोत्सव आणि आगामी काळातील सणसूद विचारात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करण्यात आली.