भंडारा तालुक्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा परसोडी येथे अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपीने राजेदहेगाव-गोवरी परिसरातील सुरु नाल्यातून अंदाजे १ ब्रास रेती (किंमत अंदाजे ₹ ५,५००/-) चोरून तिची वाहतूक केली. आरोपी त्याच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टर क्र. MH ३६/AL-४५९९ आणि ट्रॉली (एकूण किंमत ₹ ५,००,०००/-) मध्ये ही रेती भरताना आढळून आला.