कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या श्रद्धा चिभडे या सहा वर्षाच्या बालिकेचे लिव्हर डॅमेज झाल्याने पोटावर सूज आली होती,अशा परिस्थितीत चिंबळे कुटुंब कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आ. संतोष बांगर यांना आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी भेटाव्यास आले असता,आमदार बांगर यांनी त्या मुलीचे रिपोर्ट मोबाईल मध्ये काढून संबंधित डॉक्टरांना दाखवून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत देऊन मुंबई येथील दवाखान्यात जाण्यासाठी व्यवस्था केली आहे .