दहिगाव या गावात इम्रान पटेल या तरुणाची हत्या गावातीलच ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी या तरुणांनी केली होती. तेव्हा सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामिभा पाटील सह दहीगाव येथील महिलांनी पोलीस ठाण्यासमोर येऊन धडक दिली. व संशयित मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी गुन्ह्याचा सखोल तपास करावा व मयत याला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली व या संदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आले.