एका खातेदाराच्या खात्यातील रक्कम त्यांना न विचारता परस्पर स्टॉक मार्केटमध्ये वापरून फसवणूक केली असून १९ ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात कुठलीही माहिती न देता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ३ लाख ९ हजार ४१५ रक्कम जमा केली व काढली. सदर प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने करण्यात आले यावेळी महानगरप्रमुख बंटी रामटेक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.