न्यू भारत गणेश मंडळ, जैन गल्ली लातूर यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात अनोखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची खासियत म्हणजे वारकरी संप्रदायाची थिम व पारंपारिक वेशभूषा परिधान करून दिंडीचे स्वरूप उभे केले होते. मिरवणुकीत भजनी मंडळ, भारुडकार, गवळण या सादरीकरणांनी वातावरण भारावून टाकले. पारंपरिक पोशाखातील महिलांनी आणि तरुणांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवला.