डोंबिवली पश्चिम परिसरातील गोपी चौक येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाल्यावर झाकण नसल्यामुळे नाल्यामध्ये पाय घसरून एक चौदा वर्षीय मुलगा पडल्याने त्याचा मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूनंतर महानगरपालिकेला जाग आली असून नाल्यावर झाकण बसवले असल्याचे निदर्शनास येत आहे,मात्र घडलेल्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.