अमरावती जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून प्रामुख्याने स्थानिकस्तरावरील कामे करण्यात येतात. यावर्षी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षा ही प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.जिल्हा नियोजन सभागृहात आज २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन व विकास निधीबाबत बैठक पार पडली. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, विकसित भारताचे ध्येय ठरविण्यात आले आहे..