उद्या दिनांक 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनानिमित्त खामगाव शहरातील फरशी भागातून भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत एकूण २८ गणेश मंडळ सहभागी राहतील. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान खामगाव नगर पालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील फरशी मेन रोड केडिया टर्निंग निर्मल टर्निंग मस्तान चौक डाळ फाईलगवळीपुरा या सह विसर्जन मार्गावर अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या अग्निशमन वाहनाद्वारे तोडण्यात आले आहे.